Home क्राईम जळगावात वृध्द महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र धुमस्टाईल लांबविले

जळगावात वृध्द महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र धुमस्टाईल लांबविले

chain snatching

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कन्या शाळेजवळ कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून दोन तोळ्याची सोन्याची मंगलपोत लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, प्रमिला बालकीसन सोमानी (वय-७२) रा. चैतन्य नगर, भुपाली अपार्टमेंट जळगाव ह्या आपल्या परिवारासह राहतात. सोमवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास घरातील पपईचे सालटे कचरा कुंडीत टाकण्यासाठी प्रमिला सोमानी ह्या अपार्टमेंच्या खाली आल्या. पपईचे सालटे टाकल्यानंतर त्या पुन्हा घराकडे जात असतांना मागून अज्ञात दोन जण दुचाकीवरून येवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केली. महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोघे दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी प्रमिला सोमानी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि महेंद्र वाघमारे करीत आहे. 


Protected Content

Play sound