यावल प्रतिनिधी | कोरोनाचे सावट कायम असल्यामुळे पोळ्याच्या दुसर्या दिवशी होणारा माता मनुदेवीचा वार्षिक यात्रोत्सव यंदा देखील रस्त करण्यात आला असून आज मंदिर बंद राहणार आहे.
सातपुडा निवासीनी मनुदेवीच्या मंदिरात दरवर्षी पोळ्याच्या दुसर्या दिवशी यात्रा असते. खान्देशसह शेजारील मध्य प्रदेश, गुजरातमधील भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, गेल्या वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मंदिर उघडण्यास मनाई केली आहे. यंदा देखील शासनाच्या आदेशानुसार ७ सप्टेंबरचा यात्रोत्सव रद्द झाला आहे. त्यामुळे मंगळवारी मंदिर बंद राहणार आहे.
दरम्यान, आज मंदिरात पारंपारिक पद्धतीने पूजा करून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे संस्थानतर्फे जाहीर करण्यात आले आहे. यात्रा रद्द केल्याने भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये असे आवाहन संस्थान व पोलिस प्रशासनाने केले आहे.