Home राजकीय मोदी हे पाकिस्तानचा अजेंडा लागू करताय : अरविंद केजरीवाल

मोदी हे पाकिस्तानचा अजेंडा लागू करताय : अरविंद केजरीवाल


modi kejriwal
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदींनी आयएसआयला वायुसेनेच्या पठाणकोट येथील कॅम्पवर हल्ला करु दिला, नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचा अजेंडा लागू करत असून पाकिस्तानला मोदींपेक्षा चांगला पंतप्रधान मिळू शकत नसल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

 

केजरीवाल म्हणाले की, या घटना निवडणूकीपूर्वी घडवल्या गेल्या. तसेच मोदी आणि इम्रान खान यांच्यात काय शिजतंय? असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली, तर भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्याची चांगली संधी मिळेल. इम्रान खान यांच्या याच विधानाचा वापर करत केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली आहे. चार आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता इम्रान खान मोदींना पंतप्रधान होताना पाहू इच्छितात. ते असे का करत आहेत? असे अनेक सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound