जळगाव प्रतिनिधी । शहरातील डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाची गुणवत्ता हमी समिती आणि रोटरी क्लब, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.४) दुपारी २ ते ५ या वेळेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘कार्य संस्कृती आणि मुल्य संस्कार’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलन करून व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या एकदिवशीय कार्यशाळेचे दोन सत्रात विभाजन करण्यात आले होते.
प्रथम सत्रात ‘विचार बदला, आयुष्य बदला’ या विषयावर रोटरी क्लब प्रमुख वक्ते रो.पंकज व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले आणि सायकॉलॉजी संदर्भात सुरुवातीला १२ कर्मचाऱ्यांमध्ये गेम घेवून विचार कसा बदलतो, असे याबद्दल मार्गदर्शन केले. प्रथम सत्राच्या शेवटच्या १० मिनिटात शंका समाधान यावर प्रश्न उत्तरे करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात ‘कार्य संस्कृती : कौशल्य आणि वृत्ती’ विषयावर संवादक व समुपदेशक गिरीश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्य संस्कृती म्हणजे काय ? कार्य संस्कृती म्हणजे आपण काय काम करायचं, कशासाठी करायचं आणि कसं करायचं ह्यावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्य संस्कृतीचे किती प्रकार आहेत आणि त्यांचा कसा वापर आपण केला पाहिजे याबद्दल देखील त्यांनी सांगितले शेवटच्या १० मिनिटात शंका व समाधान यावर प्रश्न उत्तरे झाली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी सांगितले की, शिक्षकतेर कर्मचारी हे संस्थेतील महत्त्वाचा दूवा आहे. पहिलांदा महाविद्यालयात शिक्षकतेर कर्मचाऱ्यांसाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून महाविद्यालयाला या कार्यशाळेचा खूप मोठा उपयोग होणार आहे, असे देखील डॉ. राणे यांनी म्हटले आहे.
या कार्यशाळेप्रसंगी कर्मचारी देखील आपले अभिप्राय व्यक्त केला. यावेळी रोटरी क्लब जळगावचे प्रेसिडेंट रो. संदीप शर्मा, सेक्रेटरी रोटेरियन मनोज जोशी, लिटरसी कमिटी चेअरमन रो. केदार मुंदडा, रो गिरीश कुलकर्णी, रो पंकज व्यवहारे, प्राचार्य डॉ. गौरी राणे, उपप्राचार्य डॉक्टर वि.जे. पाटील, उपप्राचार्य डॉक्टर पी.एन तायडे, महाविद्यालयातील उपस्थित सर्व शिक्षकेतर बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परशुरामे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन रो. केदार मुंदडा यांनी केले.