जळगाव, प्रतिनिधी । शहरास पाणीपुरवठा करणे कामी पाणीपुरवठा योजनेंतर्गत मानराज मोटर्स समोरील १५०० मीमी जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम आज दि. १ सप्टेंबर रोजी करण्यात येत आल्याने शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.
मानराज मोटर्स समोरील १५०० मीमी जलवाहिनीवरील गळतीचे काम आज १ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात आले आहे. तसेच वाघुर ३३ के.व्ही. उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीच्या कामाकरिता वाघुर पंपिंग स्टेशनला होणारा वीज पुरवठा २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून बंद राहणार आहे. याकारणास्तव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. यानुसार २ सप्टेंबरचा पाणीपुरवठा ३ जुलै रोजी करण्यात येईल तसेच ३ व ४ रोजी पाणीपुरवठा अनुक्रमे ४ व ५ रोजी करण्यात येईल असे शहर अभियंता यांनी कळविले आहे.