जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक तथा उपायुक्त संतोष वाहुळे यांची मुंबई येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात बदली झाली आहे.
संतोष वाहुळे यांची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात उपसंचालक वित्तीय सल्लागार व उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे आदेश बुधवारी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव माधवी गांधी यांनी काढले आहेत. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील राज्यातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक संतोष वाहुळे यांचाही समावेश आहे.