भुसावळ प्रतिनिधी | तालुक्यातील खंडाळा येथील महिलेने आत्महत्या केल्यानंतर बिषबाधा झालेल्या तिच्या नऊ वर्षाच्या मुलाचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, खंडाळा येथील अश्विनी चौधरी या महिलेेने घरात कोणीही नसताना दिनांक दि.२५ ऑगस्ट रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेच्या काही वेळाने तिची दोन्ही मुले अनुक्रमे प्रणव (वय ३) आणि श्रेयस (वय ९) या दोघांना विषबाधा झाल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे उपचाराअंती प्रणवच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तर श्रेयसची प्रकृती अचानक खालावली. यामुळे सोमवारी त्याला जळगावहून नाशिक येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. तेथे त्याने शेवटचा श्वास घेतला. यानंतर सोमवारी रात्रीच मृतदेह गावी खंडाळा येथे आणून अंत्यविधी करण्यात आले.