Home Uncategorized खडसे इज बॅक !

खडसे इज बॅक !


IMG 20190413 WA0015
 

जळगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे आज जळगाव जिल्ह्यात परतले आहे. खडसें परतल्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. त्यामुळे खडसेंची तोफ कधी धडाडते याचीच जिल्हावासीयांना उत्सुकता लागून आहे.

 

मागील काही दिवसापासून एकनाथराव खडसे यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे ते मुंबई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज पहाटे त्यांचे रेल्वेने भुसावळ येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खडसे थेट मुक्ताईनगर येथे गेले आहेत. दरम्यान, खडसे यांच्या गैरहजेरीत जिल्हा भाजपात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे खडसे आता यावर काय भाष्य करतात, याची अनेकांना उत्सुकता लागून आहे. तर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत निर्माण होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound