बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीची कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी महेश वाणी

यावल प्रतिनिधी । येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सॊसायटीची त्रेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२१ ते सन २०२४ साठी नवीन कार्यकारिणी जाहिर झाली असून महेश वाणी याची अध्यक्षपदी तर डॉ. सतिष यावलकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सन २०२१ ते सन २०२४ साठी नवीन कार्यकारिणीची निवड- अध्यक्ष महेश वाणी, उपाध्यक्ष – डॉ. सतिष यावलकर, सचिव श्रीहरी कवाडिवाले, सहसचिव संतोष कवडिवाले, कोषाध्यक्ष ईश्वरलाल वाणी, सदस्य – डॉ. जिवन यावलकर, सदस्य पत्रकार तेजस यावलकर वरील प्रमाणे कार्यकरिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पद़माकर रतन पाटील  जळगांव यांनी काम पाहिले तर विधी तज्ञ म्हणून अँडव्हाकेट चंद्रकांत लोहार यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील भविष्यात  डिजिटल शाळा करण्यावर भर देणार असल्याचे अध्यक्ष महेश वाणी यांनी या वेळी सांगीतले. या सभेला उपस्थितांचे आभार संतोष कवडीवाले यांनी मानले. 

 

Protected Content