शेंदूर्णी प्रतिनिधी । पहुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आज पदभार स्विकारला आहे.
यावेळी त्यांनी संवाद साधताना पहुर पोलीस ठाण्याचे हद्दीत कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य व गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची मदत घेणार असून त्यात सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, पत्रकार व सामान्य नागरिक यांचे सहकार्य लाभणार आहे. सर्व सामन्य नागरिक, महिलांवर होणारे अन्याय तसेच गुन्हेगारीवर पुर्णतः नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.