Home Cities जळगाव कांताई सभागृह येथे गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

कांताई सभागृह येथे गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

0
26

जळगाव प्रतिनिधी । शिक्षक भारती शिक्षक संघटनेच्या वतीने  गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कांताई सभागृहात घेण्यात आले.

यावेळी शिक्षक आमदार तथा शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या तसेच मा . प्रतिभाताई शिंदे ( अध्यक्षा लोकसंघर्ष मोर्चा ) मा अर्जुन कोकाटे साहेब ( कार्याध्यक्ष , राष्ट्र सेवा दल ) यांच्या उपस्थित पार पडला. आपल्या बोदवड तालुक्यातून प्राथमिक विभागातून प्राथमिक शिक्षक श्री पद्माकर किसनगीर गोसावी उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हाडी यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. बोदवड तालुक्यातून त्यांचे नातेवाईक मित्र परिवार कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . प्रसंगी दिलीप जवरे सर शिक्षक भारती तालुकाध्यक्ष बोदवड, उपाध्यक्ष योगेश घाटे सर, केंद्रप्रमुख रवींद्र भालेराव सर, शिवाजी साठे सर, सुनील माळी सर, प्रवीण खरे सर, श्रीकांत कुलकर्णी सर, प्रदीप पाटील सर, मयुर पाटील, गजानन पाटील सर, जीवन शिरसाट सर, पांडुरंग पाटील सर, कैलास पाटील सर, व शिक्षक मित्र उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound