यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील विविध ठिकाणी विविध घटनांमध्ये आज एका महिलेसह तीन लोकांनी विष पिवुन आत्महत्येचा प्रयत्न केला तर एका मोटरसायकल अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दरम्यान वैयकीय अधिकारी नसल्याने या रुग्णांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसुन आहे.
याबाबत अधिक वृत असे की, आज (दि.१२) तालुक्यातील दगडी मनवेल या गावातील रहिवासी व राजेंद्र गंगाराम कोळी (वय-६०) यांनी आपल्या राहत्या घरात अज्ञात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या एका घटनेत यावल येथील सुन्दर नगरीत राहणाऱ्या सुंनदा विनोद पारधे (वय-२०) यांनीही विष प्राशन केल्याचा प्रकार घडला. त्याचप्रमाणे तालुक्यातील विरावली येथील धोंडा नवल पाटील (वय-६०) यांनीही विष पिवुन आत्महत्त्येचा प्रयत्न केला. या सगळ्यांना तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता यातील राजेंद्र गंगाराम कोळी व सुनंदा पारधे यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यातच यावल शहरापासुन एक किलोमिटर अंतरावर फैजपुर रोडवर मोटारसायकलचा अपघात होवुन यावल शहरातील अजय गोपाळ अहिरे (वय-१५) आणि नारायण (पुर्ण नांव माहीत नाही) हे दोघे गंभीर जख्मी झाले आहेत. यांनाही जळगाव येथे उपचारार्थ सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांकडुन सांगण्यात आले.
वरील तिघांनी विष पिवुन आत्महत्त्येचा प्रयत्न का केला ? हे मात्र समजु शकलेले नाही. आणखी एका घटनेत सावखेडा सिम तालुका यावल येथील एका दारूड्या बापाने आपल्याच पाच वर्षीय मुलाला दारूच्या नशेत बेदम मारहाण केल्याची निंदनीय घटना घडली असुन, यात साई सूनिल पाटील यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास देखील पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे यावल ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या सर्व रुग्णांवर रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी एम.ए. कोळपकर व विजय शिंदे, यांनी परिश्रम घेवुन प्रथमोपचार केले. याबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.