जळगाव प्रतिनिधी । तांबापूरा येथील गवळीवाडा येथे किरकोळ कारणावरून एका ५१ वर्षीय व्यक्तीला एकाने फायटरने मारहाण केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, विठोबा सज्जन हटकर (वय-५१) रा. गवळीवाडा तांबापूरा हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या शेजारी नाना उर्फ खराटा बुधा कोपनर (हटकर) रा. गवळीवाडा हे राहतात. काल रविवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विठोबा हटकर यांची नात ही खराटा हटकर यांच्या घराच्या पयरीवर खेळण्यासाठी गेली. तिच्या घेण्यासाठी विठोबा हटकर नातीला घेण्यासाठी खराटा हटकर यांच्या घरासमोर आले. याचा राग आल्याने खराटा हटकर याने विठोबा हटकर यांना शिवीगाळ करून हातातील फायटरने बेदम मारहाण केली. यात छातीला आणि डाव्या कानावर दुखापत झाली. जिल्हा शासकीय रूग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर रात्री साडे दहा वाजता एमआयडीसी पोलीसात धाव घेवून खराटा उर्फ नाना हटकर याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.