Home Cities चोपडा चोपड्यातील भगिनींकडे पालकमंत्र्यांचे रक्षाबंधन साजरे

चोपड्यातील भगिनींकडे पालकमंत्र्यांचे रक्षाबंधन साजरे

0
31

चोपडा (प्रतिनिधी ) : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी चोपडा येथील आपल्या ज्येष्ठ भगिनी सौ. निर्जलाबाई नारायण देशमुख यांच्याकडे आपले रक्षाबंधन साजरे केले.

ना. गुलाबराव पाटील यांना निर्जलाबाई नारायण देशमुख (चोपडा); सुशीलाबाई जगन्नाथ गुजर (चोपडा) आणि राधाबाई ईश्‍वरलाल पाटील (पिंप्री खुर्द, ता. धरणगाव) या तीन भगिनी आहेत. यातील निर्जलाबाई या मोठ्या भगिनींकडे ना. पाटील हे सुमारे ३५ वर्षांपासून रक्षाबंधनानिमित्त येत असतात. या नित्यनेमानुसार आज ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणीकडे जाऊन राखी बांधली. याप्रसंगी त्यांच्या दोन्ही भगिनी देखील उपस्थित होत्या.

आपण आजवर मारलेली मजल ही आपल्या वडिलधार्‍यांचे आशीर्वाद आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळेच असल्याची प्रतिक्रिया ना. गुलाबराव पाटील यांनी चोपडा येथे बोलतांना व्यक्त केली.


Protected Content

Play sound