Home क्राईम अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा

0
43

जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.  

विजय निंबा ठाकरे (वय-२१) असे आरोपीचे नाव आहे. 

सविस्तर माहिती अशी की, लग्नाचे आमिष दाखवून विजय निंबा ठाकरे या तरूणाने अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. याप्रकरणी १० जून २०१९ रोजी पीडितेच्या वडीलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १२ जूनला दोघांना नातेवाईकांनी मुलीच्या वडीलांकडे घेऊन आले. त्यानंतर पीडिता ही अल्पवयीन असताना सुध्दा तिच्यावर विजय याने अत्याचार केल्याची बाब समोर आली. ही माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात व न्यायालयात नोंदविण्यात आली.

न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर सरकारपक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार साक्ष नोंदविण्यात आली. त्यात पीडिता, पीडितेचे वडील, तिच्या शाळेचे मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार, न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळेचे तज्ज्ञ आदींच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. 

सरकारपक्षातर्फे ऍड. नीलेश चौधरी यांनी त्यांच्या युक्तीवाद केला. न्यायाधीश डी.एन.खडसे यांनी सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून विजय ठाकरे याला अल्पवयीन पीडितेस पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवत पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याबाबत व पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी बालक लैगिंक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा- २०१२ कलम ३ (अ) मध्ये दोषी धरून कलम ३६३ खाली सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व ३ हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कै द तसेच पोक्सो कमल (अ) मध्ये दहा वर्ष सश्रम कारावास व दोन हजारांचा दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.


Protected Content

Play sound