Home Cities जळगाव डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्व.राजीव गांधी यांना अभिवादन

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्व.राजीव गांधी यांना अभिवादन

0
35

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्व.राजीव गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण वाहून अभिवादन करण्यात आले. 

उपस्थित मान्यवरांनी सद्भावना दिनानिमित्‍त मनोगत व्यक्‍त केले. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, बुलढाणा जिल्ह्यातील चांदूर विचवा येथील जिल्हा परिषद सदस्य संतोष गुलाबराव पाटील, संतोष सातव यांच्याहस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील स्टाफ उपस्थित होता. 

 


Protected Content

Play sound