पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शहर व परिसरात अद्यायावत सुविधांनी सुसज्ज असे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे खडकदेवळा बु॥ ता. पाचोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (दि.१८) भव्य अशा मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराची सुरुवात डॉ. भुषण मगर (पाटील) यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पन करुन करण्यात आले. या शिबिरात गावासह परिसरातील ४९० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर, डॉ. जितेश पाटील, डॉ. सोहेल शेख सह स्थानिक डॉ. सुनिल गुजर, डॉ. राहुल तेली, डॉ. अल्ताफ पठाण या डाॅक्टरांसह नर्सिंग टीम द्वारे तपासणी करण्यात आली. शिबिरात ई. सी. जी., बी. पी., ब्लड शुगर (रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे) या सह विविध आजारांची तपासणी करुन निदान करण्यात आले.
याप्रसंगी गावातील जेष्ठ नागरिक, बंधू- भगिनी, तरुण यांनी मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ घेतला. शिबिर यशस्वीतेसाठी खडकदेवळा गावातील विश्वास आनंदा पाटील, देवचंद गायकवाड, डॉ. यशवंत पाटील, वाल्मिक पाटील, युवा नेते बापु पाटील, मुकेश पाटील, बबलु ठाकरे, जगदिश पाटील, सागर कोळी आदींनी परिश्रम घेतले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/831638670874572