अमळनेर, गजानन पाटील । अमळनेर शहर व ग्रामीण भागात दोन महिन्यानंतर काल पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेला असला तरी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यावर्षी खरीप हंगामात तब्बल दोन महिन्यात प्रथमच अमळनेर शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाला.गेल्या जून ,जुलै या दोन महिन्यात शेतशिवारात साधे डबके ही भरले नव्हते. ऑगस्टच्या अर्धा महिना उलटला तरी पाऊसच न आल्याने खरीप हंगामाची आशा मावळली होती. यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि गुरांचा चाराचा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला होता. काल ता.१७ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमळनेर सह तालुक्यातील कळमसरे ,मारवड बरोबरच बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली.यानंतर अमळनेर शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.
खरीप हुकला आता रब्बीची आशा पल्लवीत
तालुक्यात सर्वत्र दुबार पेरणी ,कापूस लागवड होऊनही अडीच महिने पाऊस नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाला होता. मात्र, काल व आज सकाळी झालेल्या पावसाने त्यांच्या रब्बी हंगामाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने गुरांना चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांसह पशुपालक यांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावत होता. काल झालेल्या पावसाने रब्बी हंगामाची आशा पल्लवित झाल्या असून असाच पाऊस होत राहिल्यास चाराची समस्या मिटेल असेही मत यावेळी शेतकरी बांधवामध्ये चर्चिल जात होते.
सलग पावसाची प्रतीक्षा
तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई भेडसावू लागली आहे.यामुळे असेच तीन चार पाऊस झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. खरीप हातातून गेल्याने रब्बीची आशा पल्लवित झाल्याने चिंतातुर झालेला शेतकरी राजा खरीप हंगामात हजारो रुपयांचा खर्च करून वाया गेल्यावरही काल दुपारी अडीच महिन्यांनी समाधानकारक नसला तरी,पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. आज सकाळी देखील पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत.
https://www.facebook.com/508992935887325/videos/358062409155435