Home Cities जळगाव भाजप वैद्यकीय आघाडी व आयटी सेलच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विषयक ...

भाजप वैद्यकीय आघाडी व आयटी सेलच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विषयक कार्यशाळा

0
30

जळगाव, प्रतिनिधी ।   भाजप वैद्यकीय आघाडी व आय टी सेलच्या  संयुक्त विद्यमाने गुरुवार १९ ऑगस्ट रोजी कोरोना विषयक  कार्यशाळा ब्राह्मण सभा येथे आयोजित  करण्यात आली आहे. 

कोरोना विषयक  कार्यशाळेला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात  राज्य वैद्यकीय आघाडी प्रभारी माजी  मंत्री आ.  गिरीश महाजन , जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे,  खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, आ.  संजय सावकारे, आ, मंगेश चव्हाण ,  जि प अध्यक्षा ना. रंजना पाटील ,प्रदेश उपाध्यक्षा माजी आ.  स्मिता वाघ  जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, सर्व सरचिटणीस , उत्तर महाराष्ट्र भाजप वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ. प्रशांत पाटील , सहसंयोजक  डॉ. नितु पाटील आदींचा समावेश आहे.   जळगाव जिल्हा कार्यशाळा दि. १९ ऑगस्ट २०२१ ,  दुपारी १ वाजता ब्राम्हण सभा , बळीराम पेठ जळगाव येथे आयोजित केली असून  या कार्य शाळेतला जिल्हा गॉमिन व महानगरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन  जिल्हा संयोजक  डॉ, नरेंद्र ठाकूर ,  डॉ धर्मेंद्र पाटील, गणेश माळी , अमीत सोळुंखे, मनोज भांडारकर यांनी केले आहे.


Protected Content

Play sound