पारोळा : प्रतिनिधी । येथील राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद भावसार यांनी कोरोनाबाधितांसाठी पंतप्रधान सहायता निधीत १५ आगस्टरोजी १० हजार रुपयांची मदत पाठवून पुन्हा सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे .
याच वर्षात भावसार यानी मुख्यमंत्री सहायता निधीतही १० हजार रुपये व आनंदवन येथे देखील १० हजार रुपयाची मदत कोरोना बाधितांसाठीच पाठवली आहे. त्यांच्या दातृत्वाबद्दल शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त करुन त्यांना धन्यवाद दिले.