जळगाव प्रतिनिधी । असोदा येथील अखिल भारतीय कोळी समाज (नवी दिल्ली) राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष, कांति कोळी, युवा राज्य अध्यक्ष परेश कोळी यांच्या आदेशानुसार असोदा येथील जयगुरुदेव प्रेरणा कन्स्ट्रक्शन व अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीचे सर्व नियम पाळून नुकताच स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
असोदा येथील व अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे जळगाव जिल्हा युवा सहसचिव योगेश बाविस्कर यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भारत मातेची प्रतिमेची पूजा करून सामुहिक राष्ट्रगीत गायन करून मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन करतांना शिवाजी महाराज भगतसिंग, राजगुरू यांना स्मरणात आणून तरूणांना त्याचे विचार मांडले. आदीवासी कोळी संघर्ष समितीचे अॅड. गणेश सोनवणे यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई व विरंगणा झलकारीबाई ची आठवण करून दिली.
अखिल भारतीय कोळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते अनिल नंन्नवरे यांनी बोलतांना म्हटले की,आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आहे,आपल्याला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून अनेक हौतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिलेली आहे. इंग्रज आपल्या देशात व्यापारी म्हणून आले व राज्यकर्ते बनले. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून हळूहळू पायामुळा पसरवत आपल्या देशातील लोकांना गुलाम बनविले व तब्बल दिडशे वर्ष अन्याय,अत्याचार केले. ज्यावेळेस क्रांतिची ज्योत प्रज्वलित झाली त्यावेळेस अनेक क्रांतिकारक आपल्या देशासाठी आपल्या कुटुंबाचा त्याग करत हसत हसत फासावर चढले.
नंदुरबार चा छोटा क्रांतिवीर बाल शिरीषकुमार वयाच्या चौदाव्या वर्षी इंग्रजांची बंदुकीची गोळी आपल्या छातीवर घेऊन आपल्या जीवाचे बलिदान दिले. अनिल दादांनी तरूणांना उद्देशून आपल्या भाषणात शहीदांचे बलिदान व्यर्थ न जाता त्यांनी दिलेल्या आहूतीमुळेच आज आपण स्वातंत्र्यात राहतो आहे. “हे मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पानी,जो शहीद हूए है उनकी जरा याद करो कुर्बानी.” शहीदांना स्मरण करून वंदन केले. असोदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दिलीप पाटील, अनिल नंन्नवरे, योगेश बाविस्कर, गणेश सोनवणे, डिगूभाऊ माळी, धनराज साळूंखे, दौलत कोळी, कैलास सपकाळे, मुकेश सोनवणे, डॉ.कदम, समाधान मोरे, मुन्नाभाऊ सपकाळे, राजू कोळी, प्रविण कोळी, गोकूळभाऊ सपकाळे, विजय सोनवणे, संजय कोळी, अॅड. गोविंदजी तिवारी, पुंडलिक गुरूजी आदी उपस्थित होते. सूञसंचालन दौलत कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन धनराज साळुंके यांनी केले.