Home राजकीय मोदी पुन्हा सत्तेत आले तर राजकारण सोडून देईन : एच डी रेवन्ना

मोदी पुन्हा सत्तेत आले तर राजकारण सोडून देईन : एच डी रेवन्ना


HD REVANNA
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर आपण राजकारण सोडून देणार, असे वक्तव्य कर्नाटकचे मंत्री आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा मुलगा एच डी रेवन्ना यांनी केले आहे. निवडणूक निकालांवर आपले मत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

 

एच डी रेवन्ना कर्नाटक सरकारमध्ये लोक निर्माण कार्य मंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत. यावेळी रेवन्ना म्हणाले की, देशासाठी मोदींनी काय योगदान दिलेय? आज मी जे म्हणतोय ते लिहून ठेवा…कारण मी पुन्हा तुमच्यासमोर येईल. जर मोदी पुन्हा देशात निवडून आले तर मी राजकारण सोडून देईन. राज्यात १८ एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत आणि अंकशास्त्राप्रमाणे ही तिथी यूपीएसाठी अनुकूल आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान नसतील असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound