गरुड विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

शेंदुर्णी प्रतिनिधी । धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी  द्वारा संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी विद्यालयात ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजस्तंभ व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर स्काऊट गाईड प्रमुख डी. बी. पाटील यांच्या हस्ते स्काऊट गाईड ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर इयत्ता बारावी विज्ञान व किमान कौशल्य विभागात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आयुषी श्याम साळुंके हिने  चित्रकला स्पर्धेत विशेष यश प्राप्त केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. संस्थेचे चेअरमन  संजय गरुड, संस्थेचे सचिव सतीश काशीद, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सागरमल जैन,संस्थेच्या महिला संचालिका उज्वला काशीद, संस्थेचे सहसचिव दीपक गरुड, संस्थेचे वस्तीगृह सचिव कैलास देशमुख, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. उदार, उपमुख्याध्यापक ए. बी. ठोके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी गावातील प्रतिष्ठित मान्यवर पत्रकार बांधव यांची उपस्थिती या कार्यक्रम प्रसंगी होती. यावेळी शासनाने घालून दिलेल्या कोरोना संदर्भात नियम व अटी यांचं तंतोतंत पालन करून हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

 

Protected Content