Home क्रीडा जळगावमध्ये क्रीडा साहित्य विक्रीचे स्पोर्ट्स हाऊसचे उद्घाटन

जळगावमध्ये क्रीडा साहित्य विक्रीचे स्पोर्ट्स हाऊसचे उद्घाटन

0
83

WhatsApp Image 2019 04 11 at 5.47.47 PM

जळगाव (प्रतिनिधी ) प्रथम खेळाडू, नंतर मार्गदर्शक व संघटक अशी क्रीडा क्षेत्राशी ५० वर्षाची सेवा करणारे फारूक शेख, व त्यांचा परिवार आमिर शेख, उमर शेख क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यवसायात प्रत्यक्ष उतरल्याने निश्चितच त्याचा फायदा खेळाडू व खेळाडूसाठी कार्यरत संघटना, शाळा, महाविद्यालय व मंडळास होईल असे प्रतिपादन जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

 

स्पोर्ट्स हाऊस या दुकानाचे उदघाटनप्रसंगी जैन बोलत होते.   यावेळी माजी मंत्री सुरेश जैन, आमदार सुरेश  भोळे,  दलीचंद जैन, राजा मयूर, अँड. सुशील अत्रे,  डॉ. विश्वेश अग्रवाल, डॉ. मयूर, डॉ.  छाबडा, डॉ. प्रभा बडगुजर, प्रो. डॉ. अनिता कोल्हे, उद्योगपती जफर शेख, डॉ. माने, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, करीम सालार, विद्यापीठ क्रीडा संचालक दिनेश पाटील, क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील ,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, आयशा खान, प्रो. डॉ. नारायण खडके ,अशोक चौधरी, डॉ प्रदीप तळवलकर  आदींची उपस्थिती होती. श्री फारूक शेख यांनी दुकानात सर्व नामांकित कंपनी चे क्रीडा साहित्य,व्यायाम शाळे साठी लागणारे साहित्य सह सर्व प्रकारची होजीअरी,संघाचे गणवेश सह शालेय विद्यार्थ्यांचे सपोर्ट ड्रेस व गणवेश तसेच कोणत्याही प्रकारच्या खेळाचे,क्रीडा स्पर्धेचे आयोजन सुध्दा करून देण्यात येईल असे सांगितले. संघटना, शाळा व महाविद्यालयास विशेष सूट देण्यात येईल खेळाडू व क्रीडा प्रेमींनी यांनी अवश्यक भेट देऊन पाहणी करावी असे आवाहन केले आहे या उदघाटन कार्यक्रमास शहरातील शाळा,महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक सोबत संघटनेचे पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.  आमिर शेख व उमर शेख यांनी आभार मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound