Home क्राईम दांडेकर नगरात बंद घर फोडले; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

दांडेकर नगरात बंद घर फोडले; रामानंदनगर पोलीसात गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । शहरातील दांडेकर नगरात बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख २३ रूपयांच मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, नरेंद्र दामोदर पाटील (वय-४७) रा. दांडेकर नगर पिंप्राळा जळगाव हे कामाच्या निमित्ताने १० ऑगस्ट रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. १० ऑगस्ट दुपारी ३ ते १२ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले १ लाख १४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ९ हजार रूपयांची रोकड असा एकुण १ लाख २३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी नरेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करीत आहे. 

 


Protected Content

Play sound