Home Cities जळगाव विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत

विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत

0
48

जळगाव, प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा ,वाघनगर येथे  पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. 

जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख अरुण वांद्रे , मुख्याध्यापक हेमराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही गुरुवार १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. परीक्षेची पाहणी करण्याकरिता शिक्षण विस्ताराधिकारी प्रतिमा सानप उपस्थित होत्या. परीक्षा केंद्र नियोजनासाठी विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील  यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयिका वैशाली पाटील यांचे सहकार्य लाभले. सचिन गायकवाड, आकाश शिंगाणे,  श्रीराम लोखंडे, सुयोग गुरव, साधना वैराळे हे पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच संजय गायकवाड, आरती ताई, सरला ताई यांनी शिक्षकेतर कर्मचारी संबंधी कार्य पार पाडले व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा नियोजनानुसार उत्तमरीत्या पार पडली. मुलांसोबत आलेल्या पालकांनी नियोजनबद्ध परीक्षा व उत्तम नियोजनाचे कौतुक करून विवेकानंद प्रतिष्ठान परिवाराचे ऋण व्यक्त करत आभार मानले.

 


Protected Content

Play sound