जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात नव्याने ५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील अहवालानुसार, जळगाव शहरात २, भुसावळ-१, चाळीसगाव-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे असे एकुण ५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६४६ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ४४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर २७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली आहे.