ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्याही समावेशासाठी आयसीसीकडून प्रयत्न सुरु

 

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.

टोक्यो ऑलिम्पिक २०२० च्या प्रचंड यशानंतर आता सर्वांच्या नजरा आगामी ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. या ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला आहे.  

आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “एक कार्यरत गट स्थापन करण्यात आला आहे, त्यांच्यावर ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या प्रक्रियेची जबाबदारी  असेल. ऑलिम्पिक २०२८, २०३२ आणि पुढील ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल.”

आयसीसीने म्हटले आहे की, “सुमारे ३० दशलक्ष क्रिकेट चाहते अमेरिकेत राहतात, त्यांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर ते खूप फायदेशीर ठरेल.” १२८ वर्षापुर्वी ऑलिम्पिकमध्ये क्रीकेट खेळल्या गेले होते. १९०० मध्ये पॅरिस येथे ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटन आणि यजमान फ्रान्सने या स्पर्धेत घेतला होता.

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. भारताच्या वतीने बीसीसीआयने असेही म्हटले आहे की जर असे झाले तर भारत नक्कीच त्यात भाग घेईल. आता टोक्यो ऑलिम्पिक २०२० संपल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याकडे वळल्या आहेत.

 

Protected Content