द्वारकाबाई महाजन यांचे निधन

एरंडोल प्रतिनिधी । येथील द्वारकाबाई महाजन यांचे आज शुक्रवार (दि.06) रोजी दुपारी 3:00 वाजता वयाच्या 89 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

दरम्यान, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, वि. का.सो. चेअरमन एरंडोल दुर्गादास महाजन आणि शिवदास महाजन यांचे द्वारकाबाई महाजन ह्या मातोश्री होत्या. त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवार दि.07 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 वाजता राहत्या घरून मारुती मढी जवळ माळीवाडा एरंडोल येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 

 

 

 

Protected Content