पाचोरा येथे सीबीएसई बारावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाचा एच. एस. सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रथम तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. 

यात विज्ञान शाखेत २९८ पैकी २९८ विद्यार्थी, कला शाखेत ३२७ पैकी ३२७ विद्यार्थी तर वाणिज्य शाखेत १५७ पैकी १४७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा १०० निकाल लागला आहे. विजयी विद्यार्थ्यांचे संसदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, सचिव अॅड. महेश देशमुख, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य जी. व्ही. पाटील, पर्यवेक्षक संजय पाटील यांनी अभिनंदन केले आहे. यात विज्ञान विभागातून प्रथम कु. अदिती गणेश सिनकर (९६ टक्के), व्दितीय कु. अबोली दादाभाऊ मांडगे (९४.८३ टक्के), तृतीय कु. मेहेक हेमंत जैन (९३.८३ टक्के), विणिज्य विभागातून प्रथम कु. पौरवी प्रमोद जोशी (८८ टक्के), व्दितीय कु. मलिका किशोरकुमार नागराणी (८७.५ टक्के), तृतीय कु.  बरखा खेमचंद रत्नानी (८७ टक्के), कला शाखेत प्रथम कु. तनुजा इसुफ पिंजारी (८३.५ टक्के), व्दितीय कु. तनया लक्ष्मण जाधव (८१.८३ टक्के), तृतीय कु. निकिता निंबा देवरे (८१.५) व कु. स्वेता भारतसींग परदेशी (८१.५ टक्के) असे घवघवीत यश संपादन केले आहे.

कन्या उच्च माध्यमिक विद्यालय 

कला शाखेत ९१ पैकी ९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तावरे कन्या उच्च माध्यमिक विद्यालय पाचोरा, विज्ञान शाखेत १०८ पैकी १०८, कला शाखेत १२० पैकी १२०, वाणिज्य शाखेत ३६ पैकी ३६ उत्तीर्ण, ग्राम विकास उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव (हरेश्र्वर) विज्ञान शाखेत २३९ पैकी २३९, कला शाखेत १८४ पैकी १८४ उत्तीर्ण, महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय, सामनेर कला शाखेत ४२ पैकी ४२, सरदार एस. के. पवार उच्च माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा विज्ञान १७८ पैकी १७८ उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Protected Content