Home Cities जळगाव अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)


जळगाव प्रतिनिधी । दिल्ली येथे दलित समाजाच्या ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचारा करून तिचा खून करून तिचे प्रेत जाळण्यात आले. या गुन्ह्यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करून त्यांना कडक शासन करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) निषेध आंदोलन करण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताची राजधानी दिल्ली येथे २ ऑगस्ट रोजी ९ वर्षीय दलित मुलीवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. नराधम एवढ्यावरच न थांबता त्यांनी मुलीला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार केला आहे. दिल्ली पोलीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दलितांवर होणाऱ्या अत्याचाराची दखल घ्यावी व गुन्हेगारास अटक करून त्यांनी कडक शासन करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून विविध मागण्याचे निवेदन‍ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिेल्यात आले.

या निवेदनावर आरपीआय जिल्हाध्यक्ष जे.डी. भालेराव, जिल्हा सचिव प्रविण परदेशी, अल्पसंख्यांक युवक जिल्हाध्यक्ष अजिज शेख, जळगाव ग्रामीण युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश सोनवणे, उत्तर महाराष्ट्र युवा नेते समिर पटेल, युवा अध्यक्ष मुकेश कोचुरे, ग्रामीण युवा सचिव बापू बिऱ्हाडे, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, दिपक बिऱ्हाडे, महानगराध्यक्ष सिध्दार्थ गव्हाणे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound