वरणगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संचालित कला वाणिज्य महाविद्यालय वरणगाव येथील शिक्षक अनिल हरी शिंदे यांना नुकतीच पीएचडी पदवी बहाल करण्यात आली. त्याबद्दल प्रा. अनिल शिंदे यांचा सत्कार माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
प्राध्यापक अनिल शिंदे हे सन- १९९४ पासून वरणगाव येथील महाविद्यालयामध्ये ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. २०१३ पासून शिंदे यांनी कवित्री बहिणाबाई विद्यापीठांमध्ये पीएच.डी.साठी सुरुवात केली. ‘बीटालाईट’ या विषयावरती शिंदे यांनी संशोधन करून पीएच.डी. पूर्ण केली आहे. या संशोधनासाठी शिंदे यांना मुक्ताईनगर येथील जे.जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. हे संशोधन पूर्ण करण्यासाठी शिंदे यांना आठ वर्षाचा कालावधी लागला. धनगर समाजातील पीएच.डी. पदवी मिळवणारे वरणगाव येथील पहिला मान हा शिंदे यांना मिळाला आहे. त्यामुळे धनगर समाजातील शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.