Home Cities चोपडा चोपडा तालुका गोरगावले केंद्रात सुजाता बाविस्कर यांचा सत्कार

चोपडा तालुका गोरगावले केंद्रात सुजाता बाविस्कर यांचा सत्कार

0
34

जळगाव प्रतिनिधी । चोपडा तालुका गोरगावले बु|| येथे मुख्याध्यापक सहविचार सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या सभेत जि.प.मराठी मुलांची शाळा वडगाव खुर्द येथील मुख्याध्यापिका सुजाता बाविस्कर यांची नुकतीच मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट, जळगाव जिल्हा महिला सल्लागार पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गोरगावले केंद्रातील जि.प.मराठी शाळांचे मुख्याध्यापक हजर होते. गोरगावले केंद्राकडून रत्नाताई शिरूडे यांचे हस्ते शाल, श्रीफल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात

सत्कार प्रसंगी दोन शब्द मनोगत व्यक्त करतांना सुजाता यांनी सर्वांचे आभार मानत वरिष्ठांचे आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली समाजात होत असलेला गोरगरीबांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देण्यात येईल. समाजात वाढत असलेला भष्टाचार रोखणेसाठी ठोस पावले उचलण्यात येतील. महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


Protected Content

Play sound