जळगाव प्रतिनिधी । बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी (मेकॅनिकल) विभागातर्फे ‘अचिव्हर्स – २०१९’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत विभागातील विद्यार्थी व शिक्षक यांचा त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या प्रावीण्यपूर्ण कामगिरीबद्दल विशेष गौरव केला जातो. सदरच्या कार्यक्रमासाठी शिक्षणासोबतच क्रीडा, कला, व्यक्तिमत्व आदी क्षेत्रात विविध स्तरावर विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सदरच्या कार्यक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष होते.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिव्हिल इंजि. विभागप्रमुख डॉ. एम. हुसेन तर व्यासपीठावर मेकॅनिकल इंजि. विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. पी. शेखावत, प्रा. एन. के. पाटील, प्रा. कृष्णा श्रीवास्तव,समन्वयक प्रा. एम. व्ही. रावलानी, डॉ. पी. जी. दामले, प्रा. डी. बी. सदाफळे, प्रा. पी. एन. उल्हे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजना संबंधी हेतू स्पष्ट करतांना प्रा. एस. पी. शेखावत यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात डॉ. एम. हुसेन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांचा गौरव आणि सत्कार
सुरुवातीला ‘GATE –2019’ या परीक्षेत यशस्वी गौरव करंजगांवकर, लाभेश पवार, सागर पिंगळे व राहुल चौधरी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शैक्षणिक वर्षातील टॉपर्स अपूर्व हुसेन, मनूप्रतापसिंग (द्वितीय वर्ष), निनाद देशमुख व मनीष बडगुजर (तृतीय वर्ष), विनीत भावसार व दीपक राऊत (चतुर्थ वर्ष) यांना गौरवण्यात आले. त्यानंतर विद्यापीठस्तरीय शोधप्रकल्प प्रतियोगिता विजेते अमित झोपे, स्वप्नील परदेशी, हितेश झोपे, आकाश यांच्या चमूचे अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रियंका खिवसरा (दिव्य मराठी आयोजित मॉडेलिंग स्पर्धेत प्रथम व केबीसीएनएमयू आयोजित मिस टाऊस व्दितीय) हिचा सत्कार करण्यात आला. योगेश सोनवणे (शेतकरी साठी ईंटरनेट जागरूकता कार्यशाळा आडगाव), अभिजित साळुंखे व चमू (समाजातील कमकुवत वर्गात शिक्षणाची संधीवर मार्गदर्शन ), हर्षल आपटे व चमू (ग्रामीण विद्यार्थी विद्यार्थयांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा) या विद्यार्थ्यांचा देखील विशेष गौरव करण्यात आला. नंतर प्रा.अजय भारद्वाज (बुद्धिबळ स्पर्धा विजेते ), डॉ. एस. पी. शेखावत (कर्णधार – विजेता व्हॉलीबॉल संघ) यांचा देखील सत्कार करण्यात आला. शेवटी विभागातील प्रा. प्रवीण पाटील यांचा जळगाव, भुसावळ, पुणे, नाशिक ई. ठिकाणच्या मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभागाबद्दल सत्कार करण्यात आला.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. चंदन मुखर्जी, प्रा. दीपक तळेले, प्रा. पी.पी. बोरनारे, प्रा तेजस पाटील, प्रा अजय पुरी, प्रा. अखिलेश राजपूत, प्रा. निखिल बारी, प्रा. गौतम सूर्यवंशी व विद्यार्थी समिती यांनी सहकार्य केले.