जयकिरण प्रभाजी न्यु इंग्लिश मिडियम स्कुलची यशाची परंपरा कायम

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथील जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मिडियम स्कूलने यशाची परंपरा कायम ठेवत सलग ९ व्या वर्षीही दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.

 

यावर्षी झालेल्या एस. एस. सी. परिक्षेत  कु. अनुष्का मनोज पाटील – ९५.४० टक्के (प्रथम), राज रविंद्र पाटील- ९५ टक्के (द्वितीय) तर  तृतीय क्रमांकाने कु. कांचन नितीन पाटील ९२.४० टक्के गुण मिळवत जयकिरण प्रभाजी न्यु इंग्लिश मिडियम स्कुलचे  लौकिक  कायम ठेवले आहे.

या यशस्वी  विदयार्थ्यांचे जयकिरण प्रभाजी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा,  उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जीवन जैन, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवानी, सचिव रितेश ललवानी तसेच सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, सी. ई .ओ., शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांवर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Protected Content