जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात चार बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ९ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. आज १३ तालुके निरंक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.
प्रशासनाने आज दिलेल्या कोरोना अहवालात जळगाव शहरात १, चाळीसगाव तालुक्यात २ आणि भुसावळ तालुक्यात १ असे एकुण ४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरातून जिल्ह्यातून ९ जण कोरोनामुक्त झाली आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ५६३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ९०१ रूग्ण कोरोनामुक्त झाली तर ८७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.