चाळीसगाव प्रतिनिधी | पशुवैद्यकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले. संपावर असलेल्या पशुवैद्यकांनी भेट घेतल्यानंतर आ. चव्हाण बोलत होते.
महाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेच्या निबंधकांनी ९ जुलै २०२१ रोजी सर्व जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आदी अधिकार्यांना पात्रता नसताना पशुवैद्यकीय व्यवसाय करणार्या पदविकाधारकांवर कारवाई करण्याचे पत्र दिले होते. यामुळे राज्यात एक लाखाहून अधिक संख्या असलेल्या खाजगी व शासकीय सेवेतील पशुवैद्य पदविका, प्रमाणपत्र धारकांत संतापाची लाट उसळली आहे. या कारणामुळे पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय सेवा संघ व पशुचिकित्सा व्यवसायी या संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तालुक्यातील पशुचिकित्सकांनी नुकतीच आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेउन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी याबाबत पाठपुराव्याचे आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, आपल्या मागण्यांना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या मार्फत गांभीर्याने लक्ष घालेल. पशुवैद्यकांवर कारवाई झाल्यास सदैव त्यांच्या पाठीशी राहू, असे आश्वासन तालुक्यातील शासकीय व खाजगी पदविका धारक पशुवैद्यकांना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले.
या भेटीप्रसंगी खाजगी पशुवैद्यकीय संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ.दीपक आहेर, तालुकाध्यक्ष डॉ.संजय साळुंखे, सचिव डॉ.शिंदे, डॉ.शेवाळे, डॉ.चिरके, डॉ.ठाकरे, डॉ.देवकर, डॉ.दरेकर, डॉ.योगेश बाविस्कर, डॉ.गवळी, डॉ.जाधव, डॉ.नीळकंठ मगर, डॉ.अमोल, डॉ.मोहन राठोड, डॉ.संदीप जाधव, डॉ.महाजन, डॉ.राठोड, डॉ.प्रवीण साळुंखे, डॉ.पाटील यांच्यासह अन्य पशुचिकित्सक उपस्थित होते.