एरंडोल प्रतिनिधी । येथील नगर पालिकेतर्फे होणारा पाणीपुरवठ्याचा नियोजना अभावी नागरिकांना त्रास होत असून नगरपालिकेने पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अंजनी धरणातून एरंडोल शहरासाठी नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. धरणात पुरेसा पाणीसाठा असून देखील केवळ नियोजनाअभावी नागरीकांना त्रास सहन करावा लागत असल्याने विशेषत : महिला वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे कधी व्हाल्व्ह नादुरूस्त, पाईपलाईन फुटली तर कधी वीज पुरवठा खंडीतच्या सबबी नपाकडून सांगितल्या जातात. मागील वर्षापासून ( मार्च २०२० ) शहरात कोरोना महामारीने नागरीक हैराण झाले आहेत. त्यामुळे नेहमी हात धुवून घरातच राहा या शासनाच्या पर्यायाने, नपाच्या आदेशांमुळे पाणी वापर जास्त होणारच त्यातच लहान मुले पाण्याचा वापर जास्तच करतात. त्यामुळे घरातील लहान मोठ भांडे भरून देखील पाणी पुरले नाही. भर उन्हाळ्यात देखील कधी ५ व्या तर कधी ६ व्या दिवशी शहरात नपामार्फत पाणी पुरवठा केला जाता यास म्हणावे तरी काय ? काहीही तांत्रिक अडचण नसेल तव्हा आठवड्यातून एकच दिवस नळांना पाणी पुरवठा केला जाता म्हणजे जर सोमवारी पाणी सोडले तर शुक्रवारीचे पाणी सोडणार हे ठरलेलेच परंतू वरील अडचणी ( व्हाल्व्ह , पाईपलाईन , वीजपुरवठा ) उद्भवल्यास मात्र दुसऱ्या दिवशी ( म्हणजे ६ व्या दिवशी ) पाणी येणार.
विशेष खेदाची बाब म्हणजे ज्या प्रभागात पाणी पुरवठा होणारा आहे त्यासाठी कमीतकमी शेवटच्या म्हणजे ४ दिवशी तरी १/२ नागरीकांना ( जबाबदार ) फोनद्वारे, व्हाट्सअॅपद्वारे मेसेज पाठविणे गरजेचे आहे. परंतू इतकी तत्परता दाखवली तर ती नपा तरी कशी ? त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा असून देखील केवळ नियोजनाअभावी नागरीकांना त्रास सहन करावा लागला आहे. तांत्रिक अडचणी समजू शकतात. परंतू जून संपून जुलै सुरू झाला तो देखील अर्धा संपला तरीही ५ व्या , ६ व्या दिवशी पाणीपुरवठा होणे योग्य नाही. एरंडोलचे नागरीक शांत, संयमी असल्याने कोरोना काळात सर्व प्रकारच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करून देखील नपाकडून वेळेवर पाणी पुरवठा होणे गरजेचे होते. परंतू तसे झाले नाही. एरंडोल नपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, कर्तव्यदक्ष मुख्याधिकारींनी लक्ष देण्याची गरज आहे.