नोकरीचे आमिष दाखवत तोतयागिरी करणारा अटकेत; रामानंद पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तोतयागिरी करत  सुमारे २९ लाख ८४ हजाराची फसवणूक करणाऱ्या एकाला रामानंदनगर पोलीसांनी अटक केली आहे. तर दोन जण फरार आहेत. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अंकित गोर्वधन भालेराव (वय-२८) रा. बौध्दवाडा मुक्ताईनगर जि.जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अमोल प्रदीप चौधरी (वय-३५) रा. वसई याला नोकरी देण्याचे प्रलोभन देवून सुमारे ४ लाख ६८ हजाराची फसवणूक केली. सोबत हेमंत सुभाष भंगाळे (वय-३३) रा. नेहरू नगर मोहाडी हात गाडी व्यवसायिक आहेत त्यांना ४ लाखात गंडविले, पुर्वा ललित पोतदार (वय-३२) रा. देहू रोड पुणे यांनी ७ लाख ३० हजारात, देवेंद्र सुरेश भारंबे (वय-३६) रा. शिवकॉलनी भुसावळ यांना २ लाख ४० हजारात, नितीन प्रभाकर सपके (वय-४५) रा. आनंदनगर मोहाडी रोड यांना १२ लाख ६० हजार रूपये असे एकुण २९ लाख ८४ हजार रूपयांची फसवणूक केली. 

संशयित आरोपी अंकित भालेराव ने आपले वैभव राणे असे बनावट नावाने ही फसवणूक केली आहे. यासाठी त्याची बहिणी स्वाती गोवर्धन भालेराव (वय-३०) आणि त्याची आई रत्नमाला गोवर्धन भालेराव (वय-६२) रा. मुक्ताईनगर असे फसवणूक करणाऱ्यांची नावे आहे. दरम्यान अमोल चौधरी यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी अंकित भालेराव याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी करत आहे.

 

Protected Content