Home Cities धरणगाव नाल्यात वाहून गेली बैलगाडी; महिला सुखरूप, पुरूषाचा शोध सुरू !

नाल्यात वाहून गेली बैलगाडी; महिला सुखरूप, पुरूषाचा शोध सुरू !

0
39

धरणगाव प्रतिनिधी | तालुक्यातील निंभोरा येथील दाम्पत्य आपल्या बैलगाडीसह नाल्यास आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना दुपारी घडली असून यातील महिला सुखरूप असून पुरूषाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी भागवत भिका पाटील व त्यांची पत्नी मालूबाई भागवत पाटील हे आज आपल्या शेतात गेले होते. दुपारी मुसळधार पाऊस झाल्यामुळे ते आपल्या बैलगाडीवरून घरी परत जाण्यासाठी निघाले. निंभोरा ते खामखेडा गावाच्या दरम्यान असणार्‍या खैरी नाल्यास पावसामुळे पुर आला होता. यातील पाण्याच्या जोरदार लोंढ्यामुळे बैलगाडीसह हे दाम्पत्य वाहून गेले.

याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी शोध मोहिम सुरू केली. यात मालूबाई या थोड्या अंतरावर झुडपात सुरक्षितपणे मिळाल्या. त्यांना बाहेर काढण्यात आले. तसेच बैलगाडी आणि बैल यांना देखील काढण्यात आले. तर भागवत भिका पाटील यांचा शोध सुरू आहे. याबाबतची माहिती समोर येताच धरणगावचे तहसीलदार व नायब तहसीलदारांनी निंभोरा येथे भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली आहे.


Protected Content

Play sound