भुसावळात महागाई विरोधात लोकसंघर्ष मोर्चाचे आंदोलन (व्हिडिओ)

भुसावळ , संतोष शेलोडे । देशातील महागाई व कृषी  विधेयक रद्द करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी  लोकसंघर्ष मोर्चा अध्यक्ष प्रतिभा  शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

 

आज भुसावळ प्रांत अधिकारी कार्यालयासमोर लोक संघर्ष मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले.  केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅस यांच्या किमती भरमसाठ वाधवल्याने प्रचंड महागाई भडकलेली आहे. जनता मेटाकुटीला आली आहे. इंधनाची दरवाढ कमी करण्यासाठी मोदी सरकार विरुद्ध हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी वाढत्या महागाई विरोधात व केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्राने केलेल्या इंधन दरवाढीस विरोध करण्यासाठी चुलीवर चहा बनवून तसेच गॅस सिलेंडर व मोटरसायकलला  हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.  याप्रसंगी ह्या आंदोलनात सचिन धांडे, दिपक काटे, नुरां तडवी , इरफान तडवी, महेंद्र गायकवाड, केशव वाघ, शेख शाबिर , भरत बारेला, भूषण जिव्हरी, हेमंत पाटील ,रंजना वाघ , रमेश बारेला यांच्या सह शेकडो कार्यकर्ते हजर होते  ह्या वेळी मोदी सरकारच्या विरोधी घोषणा देत प्रांत कार्यालया समोरील परिसर लोक संघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता.

https://www.facebook.com/508992935887325/videos/353380256400675

 

Protected Content