चाळीसगावात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती कार्यकारणी जाहीर

चाळीसगाव, प्रतिनिधी ।  चाळीसगाव शहरात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती शाखेची कार्यकारणी बैठक निता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवार रोजी पार पडली. यावेळी आठ जणांना विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती चाळीसगाव शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यासाठी निता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, ११ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अध्यक्षपदी वैशाली निकम, उपाध्यक्षपदी सतीष पाटील, कार्याध्यक्षपदी सुजय देशमुख, सचिवपदी प्रा.किरण पाटील, सोशल मीडिया विभागपदी निलेश परदेशी, वार्तापत्र व प्रकाशन विभागपदी सागर नागणे, महिला विभागपदी मंदा कांबळे व मानसिक आरोग्य विभाग  विजया चव्हाण आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. हि कार्यकारणी २०२१- २०२३ दरम्यान असणार आहे. यावेळी नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करणार असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर नागणे यांनी केले तर सुत्रसंचलन कल्पतेश देशमुख यांनी केले.

 

Protected Content