जळगाव प्रतिनिधी । गिर्हाईकाची गाडी दुरूस्तीसाठी गॅरेजवर का लावली या कारणावरुन तरुणाला चौघांनी मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, तांबापुरा येथील वसीम शकील पटेल वय 32 व शेख तौसिफ शेख अलीमुद्दीन वय 23 या दोघांमध्ये जळगाव शहरातील एमआयडीसीतील सेवा मोटर्स गॅरेज मध्ये भागीदार आहे. या भागीदारीवरुन दोघांमध्ये मतभेद आहेत. याच कारणावरुन 7 जुलै रोजी रात्री आठ वाजता अजिंठा लॉन्स परिसरातील सेवा मोटर्स गॅरेजवर तौसिफ अलमोद्दीन शेख याच्यासह पाच जणांनी वसीम पटेल यास शिवीगाळ करत लोखंडी व प्लास्टिक पाईपने मारहाण मारहाण केली. तुम्ही जर आमच्या नांदी लागले तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. वसीम पटेल याच्या तक्रारीवरुन गुरुवार 8 जुलै रोजी दुपारी दीड वाजता तौसिफ अलमोद्दीन शेख, शोएब शेख, जावेद शेख, जमीर शेख व आशिफ शेख सर्व रा. रजा कॉलनी शेरा चौक जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहेत.