Home Cities पारोळा डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी वानखेडे

डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी वानखेडे

0
89

पारोळा प्रतिनिधी । महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण वानखेडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. यात उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण महादू वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष मंगल जावळे, खजिनदार भिकन आहिरे, सचिव दीपक वानखेडे, कार्याध्यक्ष किशोर वानखेडे, सल्लागार बाळासाहेब सरदार यांचा समावेश आहे. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून महादू वानखेडे, साहेबराव वानखेडे, माजी नगरसेवक भीमराव जावळे, राजू नेतकर, भगवान सरदार, गौतम वानखेडे, भीमराव सूर्यवंशी, बिर्‍हाडे, मंगल बाविस्कर, खैरनार, लोंढे गुरुजी, संजय वानखेडे यांची निवड करण्यात आली.

या बैठकीला राजेश सरदार, रवींद्र जावळे, जितेश वानखेडे, गौतम जावळे, सचिन नेतकर, रवींद्र सरदार, मनोज वानखेडे, नरेश सपकाळे, भगवान वानखेडे, संदीप वानखेडे, नितीन वानखेडे, आनंद वानखेडे, सिद्धार्थ वानखेडे, मिलिंद सरदार, अमोल सोनवणे, किरण जावळे, राजेश वानखेडे, यांची उपस्थिती होती. या वेळी सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound