पाचोरा येथील शैलेश कुलकर्णी यांना “खान्देश रत्न जीवन गौरव” पुरस्कार जाहीर

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी (रांगोळीकार व चित्रकार) यांना नुकताच ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन चाळीसगाव जळगाव यांच्या वतीने  शैलेश कुलकर्णी यांना ”खान्देश रत्न जीवन गौरव २०२१ पुरस्कार” त्यांच्या रांगोळी कार्याची दखल घेऊन नुकताच जाहीर झाला आहे.

शैलेश कुलकर्णी हे जे जे कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे. ते विशेषतः रांगोळी कलेमध्ये कार्य करत असून आतापर्यंत त्यांनी १५० च्या वर रांगोळी कलाकृती रेखाटल्या असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य तसेच राज्याबाहेर जाऊन त्यांनी आपली कला सादर केली आहे . तसेच आतापर्यंत त्यांना राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर १०० च्या वर पारितोषिके तसेच पुरस्कार प्राप्त झाले असून नुकतीच त्यांच्या कलाकृतीची नोंद प्रतिष्ठित अशा समजल्या जाणाऱ्या एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. अगदी सर्वसाधारण परिस्थितीत तून आजवरचे यश मिळविताना आपल्या पाचोरा शहराचे नाव त्याने वेगळ्या उंचीवर नेत असल्याने संपूर्ण शहरवासियांनकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपल्या वर जीवापाड प्रेम करणाऱ्या कलारासिकांच्या प्रेमामुळे मला अजुन प्रोत्साहन मिळते त्यामुळे असेच प्रेम नेहमी माझ्यावर असूदेत अशी प्रतिक्रिया त्यांनी या वेळी बोलतांना दिली.

 

Protected Content