
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील माहेरवाशिनीला पन्नास हजारासाठी छळ करणाऱ्या पतीसह तीन जणावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील म्हसावद येथील माहेर असलेल्या नजमाबी तौफिक पिंजारी (वय-२५) विवाहितेचा २०१९ मध्ये मध्यप्रदेशातील बलवाडी ता. वरला. जि.बडवाणी येथील तौफिक हुसेन पिंजारी यांच्याशी झाला होता. लग्नात तुझ्या वडीलांनी हुंडा कमी दिला म्हणून माहेरहुन ५० हजार रूपये आणावे यासाठी पती तौफिक पिंजारी याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. यासाठी सासरे हुसेन गुलाब पिंजारी, सासू जुबेदी हुसेन पिंजारी रा. बलवाडी ता. वरला जि. बडवाणी यांनी देखील पाठबळ दिले. हा प्रकार असहाय्य न झाल्याने विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात ७ जुलै रोजी पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बळीराम सपकाळे करीत आहे.


