प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं

 

मुंबई: वृत्तसंस्था । अगदी कालपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशासाठी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांची संधी हुकली आणि आज सकाळपासून हे चित्र पूर्णपणे पालटले

 

पंतप्रधान मोदी यांनी धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्रातील काही अनपेक्षित चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली. मात्र, तरीही काहीजण प्रीतम मुंडे या मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्याचा छातीठोक दावा करत होते.

या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करुन हा संभ्रम दूर केला आहे. खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पहिली ती चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान  न  मिळाल्याचे काही राजकीय पडसाद उमटणार का, हे आता पहावे लागेल.

 

 

Protected Content