रावेर प्रतिनिधी । बारा आमदारांचे निलंबन करून लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या महाआघाडी सरकारचा निवेदनाद्वारे रावेर तालुका भाजपातर्फे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला आहे.
पावसाळी अधिवेशनात बारा आमदारांचे निलंबन करून लोकशाहीची गळचेपी करणा-या महाआघाडी सरकारचा रावेर भाजपा तर्फे निषेध करण्यात आला यावेळी निवेदनावर भाजपा उत्तर महाराष्ट्रा अध्यक्ष सुरेश धनके जि प सदस्य नंदकिशोर महाजन कैलास सरोदे भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर सरचिटनिस सि एस पाटील महेश चौधरी पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी योगिता वानखेडे माजी प स सदस्य महेश पाटील अमोल पाटील शिवाजीराव पाटील संदीप सावळे हरलाल कोळी आदीच्यां निवेदनावर सह्या होत्या.