Home क्राईम यावल येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी

यावल येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी


Crime l 1

यावल (प्रतिनिधी) । येथील पोलीस स्टेशनच्या समोर जुन्या वादात शाब्दीक चकमकनंतर होवुन दोन गटात मारहाण केल्याची घटना घडली असुन या संदर्भात पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील सर्व लोकांना चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

 

याबाबतची मिळालेली माहीती अशी की, यावल येथील रहिवासी जुगल श्रीनिवास पाटील यांने विरावली येथील राहणारे शिवाजी प्रेमचंद पाटील व इतर जणांविरूद्ध न्यायलयाच्या आदेशावरून कलम १५३ (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला. याचे वाईट वाटल्याने आज ९ एप्रिल रोजी यावलच्या तहसील कार्यालयाच्या आवारात पोलीस स्टेशनसमोर पोलीस कर्मचारी शासकीय कामावर हजर असतांना जुगल श्रीनिवास पाटील, सागर सुनिल चौधरी, सचिन सुनिल चौधरी, रविन्द्र डिगंम्बर पाटील, आणी तुषार सांडुसिंग पाटील यांन एकमेकांना आरडाओरड करून झोंबाझोबी करून मारहाण केली. म्हणुन पोलीस कर्मचारी युनुस जुम्मा तडवी यांच्या तक्रारीवरून भादवी कलम १६० सह महाराष्ट्र पोलीस कलम ११२/११७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोउनि सुनिता कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. पोलीस स्टेशनच्या समोर झालेल्या या अचानक मारहाणीच्या गोंधळा मुळे बघणाऱ्यांची गर्दी जमा झाली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound