राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त शहरातील डॉक्टरांचा हृदय सत्कार

जळगाव, प्रतिनिधी ।  भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी आणि अथर्व पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त शहरातील नामवंत डॉक्टरांचा सत्कार पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांच्या नेतृत्वात करण्यात आला.

कोविड – १९ च्या महामारीत स्वतःच्या जिवाची  पर्वा न करता कोविडच्या रुग्णांना अहोरात्र समर्पित सेवा देणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत  डॉ.कलाम पुस्तक भिशी व अथर्व प्रकाशनाच्या संयुक्त विद्यमाने  शासकीय निर्बंध पाळत सार्वजनिक कार्यक्रम न ठेवता कालोचित प्रत्येक डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन व्यक्तीशः शाल,श्रीफळ व वाचनीय पुस्तके देऊन डॉक्टरांचा हृद्य सत्कार करण्यात आला.  सत्कार अभियानाचा शुभारंभ डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या क्लिनिकपासून करण्यात आला. संयोजक विजय लुल्हे यांनी  यांनी प्रस्तावना केली. डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी प्रभु धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. रुग्णांना सेवा देतांना तथा कर्तव्य बजावतांना निधन झालेल्या कोरोना योद्धा डॉक्टरांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले उपस्थित होते. तज्ज्ञ डॉ. प्रदिप जोशी, मालती ॲक्सिडंट हॉस्पिटलचे डॉ. प्रताप जाधव व स्पर्श फिजिओथेरपी सेंटरचे डॉ. गजानन पाटील, डॉ. देविदास सरोदे यांचा सत्कार केशव स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड यांनी केला.  तिलोत्तमा गाजरे यांचा सत्कार चित्रकार सुनिल दाभाडे यांनी केला. डॉ. रेखा महाजन यांचा सत्कार कुमुद प्रकाशनाच्या संचालिका संगीता माळी यांनी शाल श्रीफळ “.श्यामची आई ” कादंबरी देऊन सत्कार केला. आर्यन इको रिसॉर्टचे संचालक डॉ. रवी महाजन यांचा सत्कार आर्किटेक्ट प्रमोद महाजन यांनी केला. न्यूरोसर्जन डॉ. राजेश डाबी यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार दिपक महाले यांनी केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा सत्कार विजय लुल्हे यांनी केला. तसेच कोविड – १९ नमुना संकलन टिमच्या डॉ. अनुराधा वानखडे,डॉ. राखी यादव, डॉ. सतीष सुरळकर यांच्यासह डॉ.नीरज देव व सौ.रम्याई देव,दृष्टी हॉस्पिटलचे डॉ.उल्हास कोल्हे, दत्त नर्सिंग होमचे डॉ. संजय महाजन, डॉ.उ मेश वानखेडे (ऑर्थो ) यांचा सत्कार विजय लुल्हे यांनी केला. डॉ. बी. डी. सुतार यांचा सत्कार उषा सोनार यांनी डॉ.संपत वानखेडे यांचा सत्कार ग्रेडेड मुख्याध्यापक बाळकृष्ण ठोसरे ,न्युरोसर्जन डॉ. प्रशांत साठे यांचा सत्कार पत्रकार किशोर शिंपी यांनी केला. डॉक्टर्स डेच्या सत्कार उपक्रमासाठी पुस्तक भिशी संस्थापक मार्गदर्शक निवृत्त शिक्षण उपसंचालक प्राथमिक कवी लेखक शशीकांत हिंगोणेकर,निवृत्त माध्यमिक उप शिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले सर , के. प्र. कवी अरुण वांद्रे, विशाखा देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले.

 

Protected Content